Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणूक आता 13 ऑक्टोबर ऐवजी 16 ऑक्टोबरला होणार

एमपीसी न्यूज – राज्यातील विविध 18 जिल्ह्यातील 82 तालुक्यांमध्ये 1,165 ग्रामपंचायतींच्या (Gram Panchayat Election) सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 ऐवजी आता 16 ऑक्टोबर 2022 ला मतदान होईल, तर मतमोजणी 14 ऑक्टोबर 2022 ऐवजी आता 17 ऑक्टोबर 2022 रोजी होईल अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

PCMC News : महापालिकेतील दोन अधिकाऱ्यांच्या कामकाजात पुन्हा अदलाबदल

राज्य निवडणूक आयोगाने 7 सप्टेंबर 2022 रोजी 1166 ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यात सदस्यपदांसह थेट सरपंच पदाचाही समावेश आहे. सुधारित कार्यक्रमानुसार 16 ऑक्टोबर 2022 ला सकाळी 7.30 वा. ते सायंकाळी 5:30 वा. या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वा. पर्यंत मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 17 ऑक्टोबर 2022 रोजी होईल मतमोजणीचे ठिकाण व वेळ संबंधित तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने निश्चित करतील, असेही आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकात (Gram Panchayat Election) नमूद केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.