Pune : गुंजवणी पाइपलाइनला न्यायालयाचा हिरवा कंदील – विजय शिवतारे

विरोधातील याचिका फेटाळल्या

एमपीसी न्यूज – मुंबई उच्च न्यायालयाने आज गुंजवणी बंद पाईपलाईन विरोधात दाखल केलेल्या सर्व याचिका फेटाळल्या. मागील काही महिन्यांपासून सुरू असलेला लपंडाव त्यामुळे संपुष्टात आला असून लार्सन अँड टुब्रो या नामांकित कंपनीला हे काम सुरू करण्यास न्यायालयाने परवानगी दिलेली आहे.

पुरंदर तालुक्यातील काँगेसच्या नेत्यांनी स्वतः नामनिराळे राहून इतरांच्या आडोशाने शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याचा प्रयत्न केला, अशा शब्दांत जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी काँगेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांचावर हल्लाबोल केला. पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत शिवतारे बोलत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.