Juni Sangvi : गोवर, रुबेला प्रतिबंधक लसीकरणासाठी पालकसभा

एमपीसी न्यूज – सध्या विषाणूजन्य आजाराचे प्रमाण वाढत आहे. गोवर व रुबेला ही याच आजारांपैकी एक आहेत. पल्स पोलिओप्रमाणेच भारत देश हा गोवर व रुबेला मुक्‍त करण्याचा संकल्प शासनाने केला आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात यासाठी मोठी मोहीम राबवण्यात येणार आहे. या सदंर्भात आरोग्य विभागातर्फे जुनी सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीमध्ये पालकसभेचे आयोजन करण्यात आले.

यामुळे पालकांनी 15 वर्षाखालील बालकांना गोवर व रुबेला प्रतिबंधक लसीकरण करून घेण्यात यावे, असे आवाहन स्व. इंदिरा गांधी प्रसूतिगृह व रुग्णालयाच्या परिचारिका मंजुषा इंगळे यांनी केले. येत्या 14 नोव्हेंबर नंतर राज्यात गोवर व रुबेला प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. या लसीविषयी जनजागृती व माहिती देण्याकरिता आरोग्य विभागाच्या वतीने विविध शाळांमध्ये पालकसभा घेण्यात येत आहेत. या अंतर्गत जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीमध्ये पालकसभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मंजुषा इंगळे यांनी गोवर व रुबेला आजाराची लक्षणे, घ्यावयाची काळजी, तसेच लसीकरण मोहिमेविषयी पालकांना माहिती दिली. यावेळी सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका गीता येरुणकर, हर्षा बाठिया, तेजल कोळसे-पाटील, भटू शिंदे, तसेच पालक, शिक्षक आदी संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like