New Guidelines : 5 ऑगस्टपासून देशात जिम आणि योगा सेंटर सुरू होणार

The gym and yoga center in the country will start from August 5 ; 1 ऑगस्टपासून अनलॉक 3 ची अंमलबजावणी सुरु

एमपीसी न्यूज : केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आज नवीन मार्गदर्शक सुचना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार येत्या 1 ऑगस्टपासून अनलॉक 3 ची अंमलबजावणी सुरु होणार आहे.

त्याअंतर्गत 5  ऑगस्टपासून व्यायामशाळा आणि योग केंद्र सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर रात्रीची संचारबंदीही उठविण्यात आली आहे.

 दरम्यान, 31 ऑगस्टपर्यंत सिनेमा हॉल, जलतरण तलाव, करमणूक उद्याने, थिएटर, बार, सभागृह बंद राहणार आहेत. तसेच सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्य यासाठी सुद्धा 31 ऑगस्टपर्यंत बंदी राहणार आहे.

काय आहे नवीन नियमावली

* नाइट कर्फ्यू हटवण्याचा निर्णय. यामुळे रात्री फिरण्यावरील बंदी  उठविण्यात आली आहे.

* योगा इन्स्टिट्यूट आणि व्यायामशाळा 5 ऑगस्टपासून सुरु करण्याची परवानगी.

* सोशल डिस्टन्सिंग आणि करोनाचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून महत्त्वाचे निर्देश देण्यात येणार आहेत.

* 15 ऑगस्टला सोशल डिस्टन्सिंग आणि इतर आरोग्याशी संबंधित नियमांचं पालन करत स्वातंत्र्यदिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी.

* राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत चर्चा केल्यानंतर शाळा, कॉलेज आणि कोचिंग संस्था 31 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय.

* आंतरराष्ट्रीय प्रवाशांना वंदे भारत मिशन अंतर्गत मर्यादित प्रवासासाठी परवानगी.

* कंटेनमेंट झोनसोबत बाहेर मेट्रो रेल, सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, चित्रपटगृह, बार, सभागृह बंदच राहणार

* कंटेनमेंट झोनसोबत बाहेर सामाजिक, स्पोर्ट्स, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.