Chikhali News : दिव्यांग बालकाला सोडले बाजरीच्या शेतात

एमपीसी न्यूज – तीन वर्षाच्या दिव्यांग विशेष बालकाला त्याच्या आई वडिलांनी बाजरीच्या शेतात सोडून दिले. ही घटना शुक्रवारी (दि. 30) दुपारी चिखली येथे घडली.

पोलीस कर्मचारी सचिन राम भिसे यांनी याबाबत शुक्रवारी (दि. 30) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली येथील चिंचेचा मळा, धनगर बाबा मंदिरासमोर, किसन तुकाराम ताम्हणे यांच्या बाजरीच्या शेतामध्ये एका दिव्यांग बालकाला बेवारसपणे सोडले असल्याची माहिती चिखली पोलिसांना शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता अज्ञातांनी एका तीन वर्षीय बालकाला उघड्यावर सोडून दिले होते. पोलिसांनी बालकाला ताब्यात घेऊन उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.