Pune : धोकादायक भिडे वाडा रिकामा करून घ्यावा; महापालिकेच्या बैठकीत सोमवारी चर्चा

एमपीसी न्यूज – भिडे वाड्याचे स्मारक होण्यासाठी पुणे महापालिकेच्या आणि शासनाच्या बाजूने महाधिवक्तांनी न्यायालयात बाजू मांडावी. राज्य शासनाने त्यांना तशा सूचना द्याव्यात, अशी विनंती करण्यासाठी महापालिका शासनाला व महाधिवक्त्यांना पत्र देणार आहे. यासोबतच पालिकेच्या पुरातत्व विभाग आणि बांधकाम विभागाने समन्वयाने काम करून धोकादायक झालेला हा वाडा रिकामा करून घ्यावा, अशीही सोमवारी झालेल्या महापालिकेच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश ससाणे यांनी प्रभारी आयुक्त रुबल अगरवाल यांच्या कक्षात बैठक बोलावली होती. यावेळी भूसंपादन, विधी, बांधकाम आणि हेरीटेज विभागाचे अधिकारी उपस्थित होते. भिडे वाड्याचे दोन मालक न्यायालयामध्ये गेलेले असून सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयामध्ये आहे. भिडे वाड्याची इमारत जीर्णावस्थेत असून मोडकळीस आलेली आहे. याठिकाणी राहणारे भाडेकरु, पोटभाडेकरु आणि मालकांनाही यापूर्वी पालिकेने नोटीसा बजावलेल्या आहेत.

नगरसेवक योगेश ससाणे म्हणाले, भिडेवाडा स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्तीची गरज आहे. स्मारकाच्या सद्यस्थितीची माहिती घेण्यासाठी अतिरीक्त आयुक्तांकडे बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी झालेल्या चर्चेनुसार राज्याच्या महाधिवक्त्यांना मुख्यमंत्र्यांनी न्यायालयात बाजू मांडण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती करणारे पत्र शासनाला पाठविण्यात येणार आहे. येत्या 6 जानेवारीला यासंदर्भात न्यायालयात सुनावणी असल्याने त्यापूर्वी सरकार स्थापन झाले स्मारक करणे सोपे होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.