Pimpri News : महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांचे गोपनीय अहवाल पाठविण्यास विभागप्रमुखांची टाळाटाळ

एप्रिल अखेरपर्यंत गोपनीय अहवाल सादर करण्याचे प्रशासनाचे आदेश

0

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिकेतील गट अ,  ब आणि क वर्गातील अधिकारी, कर्मचा-यांचे गोपणीय अहवाल सादर करण्यास विभागप्रमुखांकडून टाळाटाळ केली जात आहे. विभागाकडील यापूर्वी सादन न केलेले अहवाल, 2019-20 या वर्षाचे गोपनीय अहवाल 30 एप्रिलपर्यंत पाठविण्याचे तातडीचे परिपत्रक प्रशासनाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांनी काढले आहे.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील व प्रतिनियुक्तीवरील गट ‘अ’,  ‘ब’ आणि ‘क’ वर्गातील अधिकारी, कर्मचा-यांचे गोपनीय अहवाल दरवर्षी 31 मार्च रोजी सादर करणे आवश्यक असते. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या वर्षातील कार्यमुल्यमापन अहवाल सर्व शाखाधिकारी, विभागप्रमुखांनी अहवालाबाबत वेळापत्रकानुसार योग्य ती कार्यवाही करणे आवश्यक होते.

कार्यमुल्यमापन अहवाल प्रशासन विभागाकडे 16 जानेवारी 2021 पर्यंत पाठविणे आवश्यक होते. परंतु, अद्याप विभागप्रमुखांनी गोपनीय अहवाल प्रशासन विभागाकडे पाठविले नाहीत. ही बाब योग्य नाही. त्यामुळे विभागप्रमुखांनी विभागाकडील यापूर्वी सादन न केलेले अहवाल, 2019-20 या वर्षाचे गोपनीय अहवाल 30 एप्रिल 2021 पर्यंत प्रशासन विभागाकडे तातडीने सादर करण्याचे तातडीचे परिपत्रक प्रशासन विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांनी काढले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment