Pune : पुण्यातील त्या हिरकणीचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवतीकडून कौतुक

एमपीसी न्यूज – पुण्यात गुरुवारी मुठा उजवा कालवा फुटल्याने दांडेकर पूल परिसरात निर्माण झालेल्या पूरस्थितीवेळी महिला पोलीस कॉन्स्टेबल निलिमा गायकवाड यांनी नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने सन्मान करण्यात आला.

स्वतः पाण्यात उतरुन एका लहान मुलाला आपल्या पाठीवर घेऊन निलिमा यांनी अत्यंत्य धाडसाने आपले कर्तव्य पार पाडले. आपत्कालीन परिस्थितीत त्यांनी दाखवलेल्या अतुलनीय कार्याची सर्वत्र चर्चा आहे. निलिमा गायकवाड या दत्तवाडी पोलीस चौकीच्या महिला कॉन्स्टेबल आहेत.

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या संघटक वर्षा जगताप यांच्या हस्ते निलिमा गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला. कविता खराडे, गंगाताई संजय धेंडे, मेघना जगताप, ज्योती शिंदे तसेच वरीष्ठ पोलीस निरीक्षक देविदास हिरवे व सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.