Alandi : आळंदी मधील ऐतिहासिक भागीरथी कुंडच दिसेनासे !

एमपीसी न्यूज – आळंदी (Alandi)  येथील ऐतिहासिक महत्व असलेल्या भागीरथी कुंडाकडे प्रशासनाचे, संबंधित कार्य करणाऱ्या व्यक्ती , संस्थांचे पूर्ण पणे दुर्लक्ष दिसून येत आहे. अस्वच्छ काळे कूट पाणी, त्यात पडलेल्या रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या, गोण भरून त्या पाण्यामध्ये टाकलेला कचरा , प्लास्टिकच्या पिशव्या त्या पाण्यामध्ये टाकलेला इतर कचरा. कुंड संरक्षक भिंतीजवळ बाहेरील बाजूस ही शिळे अन्न, दारूच्या मोकळ्या बाटल्या व इतर कचरा अशी दुरवस्था पवित्र भागीरथी कुंडाची सद्यस्थितीत दिसून येत आहे.
2018 मध्ये काही व्यक्ती, संस्थेकडून या कुंडा मधील गाळ काढून दुरवस्था झालेल्या मधोमधील दगडी भागाचे परत दगडी बांधकाम करण्यात आले होते. त्याला सुस्वरूप देण्याचे काम करण्यात आले होते. तसेच 2022 मध्ये नगरपालिका व इतर संस्था यांच्या सहकार्यातून कुंड संवर्धनासाठी या कुंडातील गाळ काढून मूळ कुंडात बदल करत त्यावर सिमेंटच्या भिंती उभ्या केल्या. संरक्षक भिंतीवर उंच लोखंडी जाळ्या लावण्यात आल्या. कारण कुंड अस्वच्छ होऊ नये.तेथील कुंडातील पाणी स्वच्छ रहावे.
परंतु दगडी बांधकामावर मधोमध उंच सिमेंटच्या भिंती बांधल्याने, मुळ स्वरूपातील तेथील दगडी बांधकामाचे कुंडच दिसेनासे झाले. व त्या कुंडात उतरून तेथील जल तीर्थाचा लाभ घेण्यासाठी कुंडा मध्ये उतरण्यासाठी योग्य त्या ठिकाणी मोकळी जागा ठेवणेआवश्यक होते. व ते कुंड अस्वच्छ झाल्यास कुंडा मध्ये उतरून  स्वच्छ करण्यासाठी काय उपाय योजना कराव्यात यासाठीचे नियोजन आवश्यक होते. त्याचा अभाव ही दिसून येत आहे.

मधोमधील दगडी बांधकामावर केलेल्या सिमेंट काँक्रीटीच्या भिंती मुळे त्या कुंडाचे जल तीर्थ दिसत नाही.ते दिसण्यासाठी संरक्षक भिंतीवर उभे राहून पहावे लागते. संरक्षण भिंतीवर चढून पाहणे भाविकांना शक्य नाही.दुर्घटना ही घडू शकतात. कुंड संवर्धन करण्या दरम्यान या ऐतिहासिक कुंडाच्या मधोमध दगडी बांधकामावर सिमेंट काँक्रीट च्या भिंती  बांधल्या त्याचा कितपत उपयोग झाला?
मधोमध असलेल्या दगडी बांधकामावर सिमेंट काँक्रीट
करून नक्की साध्य काय झाले? भाविकांना त्या जल तीर्थाचा लाभ मिळावा यासाठी त्या कुंडात उतरण्यासाठी योग्य त्या ठिकाणी मोकळी जागा का ठेवण्यात आली नाही? तसेच या ऐतिहासिक कुंड असलेल्या ठिकाणी त्या कुंडाचे नाम फलक व संबंधीत माहिती का लावण्यात आली नाही.असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. त्या कुंडा शेजारून गावातील व बाहेरून येणारे अनेक नागरिक जात असतात.परंतु तिथे पवित्र भागीरथी कुंड आहे हे काहींना माहीतच नाही.

आळंदी मध्ये (Alandi) उन्हाळ्यात 1987 ते 1994 पर्यंत इंद्रायणी नदी कोरडी पडली की पाणी टंचाई निर्माण व्हायची. मात्र प्रदक्षिणा रस्त्या वरील फ्रुटवाला धर्मशाळेची विहीर व या कुंडातील पाण्याचा नागरिकांना आधार होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.