Bhosari : सागरमाथा कडून बालगिर्यारोहकांचा सन्मान

एमपीसी न्यूज – भोसरी येथील सागरमाथा गिर्यारोहण संस्थेतर्फे, गिरीजा लांडगे व सई भालेघरे या दोन बालगिर्यारोहकांचा आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

गिर्यारोहण या साहसी खेळाबाबत समाजात जागरूकता व्हावी व शालेय जीवनातच मुलांना या खेळाची आवड निर्माण व्हावी तसेच आपल्या शहरातही चांगले गिर्यारोहक घडावेत यासाठी सागरमाथा गिर्यारोहण संस्था कार्यरत असून गिरीजा व सई या बालगिर्यारोहकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. अशी माहिती संस्थापक सचिव प्रशांत पवार यांनी दिली.

सन्मानार्थीची कामगिरी खालीलप्रमाणे -गिरीजा धनाजी लांडगे, वय वर्षे – 9. – वयाच्या 4 थ्या वर्षापासुन गडकिल्ले भटकंतीस सुरुवात. – सह्याद्रीतील 51 किल्ले पादाक्रांत. – 25 ते 28 ऑक्टोबर या 4 दिवसांत नाशिकमधील 12 किल्ले सर. – वयाच्या 8 व्या वर्षी लिंगाणा सर करणारी पहिली मुलगी.-वयाच्या 9 व्या वर्षी अतिकठीन श्रेणीतील वजीर सुळका सर करणारी पहिली मुलगी. – दोन्ही मोहीमेत गिरीजाकडून “लेक जगवा, लेक वाचवा, लेक वाढवा” हा संदेश.

– गडकिल्ले भटकंती बरोबरच स्केटिंग, स्विमिंग व ॲथलेटिक्सचाही सराव.

– सई मनोज भालेघरे वय वर्षे – 11 – सह्याद्रीतील 50 हून अधिक गडकिल्ले सर.

– सह्याद्रीतील अतिकठीन अशा अलंग, मदन व कुलंग या दुर्गत्रयीवर यशस्वीपणे चढाई.

– लोणावळा जवळील कठिन श्रेणीतील तैलबैला सुळका सर. – प्रस्तरारोहणातील प्रशिक्षणासह कराटे मध्येही ब्लॅक बेल्ट.

या कार्यक्रमात एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर यांनी साहसी खेळाबाबत मार्गदर्शन केले तर आमदार महेशदादा लांडगे व नगरसेवक जितेंद्र पवार यांनी या बालगिर्यारोहकांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

तसेच या कार्यक्रमास नगरसेवक सचिन चिखले, बापू घोलप, दुर्ग अभ्यासक निलेश गावडे व विरगळ अभ्यासक अनिल दुधाने आदी उपस्थित होते. तर गडकिल्ले सेवा समिती व दुर्गमहर्षी प्रमोद मांडे विचार मंच यांचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  संतोष घुले यांनी केले तर आभार ब. हि. चिंचवडे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.