Pimple Saudagar News : हॉटेलमध्ये राहून गेलेल्या महिलेला हॉटेल मॅनेजरने पाठवला पॉर्न व्हिडिओ 

एमपीसी न्यूज – हॉटेलमध्ये राहून गेलेल्या महिलेला हॉटेल मॅनेजरने व्हॉट्सॲप वरती पॉर्न व्हिडिओ पाठवल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी हॉटेल मॅनेजर विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.11) हा प्रकार घडला. 

याबाबत पिडीत महिलेने शनिवारी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हॉटेल श्रीकोट केस्टल, श्रीकोट गंगानाली, श्रीनगर गढवाल येथील हॉटेल मॅनेजर चमोली याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या हॉटेल श्रीकोट केस्टल येथे राहण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी हॉटेल मॅनेजरला त्यांनी आपला नंबर दिला. या नंबरच्या व्हॉट्सॲप वरती हॉटेल मॅनेजरने पॉर्न व्हिडिओ पाठवला, असे फिर्यादीत नमूद केले आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.