Lonavala News : पांगोळीत अचानक लागलेल्या आगीत घर जळून खाक

एमपीसी न्यूज : पांगोळी गावात शुक्रवारी रात्री अचानक एका घराला लागलेल्या आगीत घरातील सर्व चिजवस्तू व घर पुर्णतः जळून खाक झाले. अचानक लागलेल्या आगीत घरातील सिलेंडरचा देखील स्फोट झाल्याने आगीचा मोठा भडका उडाला होता.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी सागर गौतम गायकवाड यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात आगीची माहिती दिली. सागर यांनी दिलेल्या पोलीस स्टेशनला दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घराला अचानक आग लागली. यामध्ये घरातील लाकडी फर्निंचर व पोट माळा यांनी आग पकडल्याने आगीच्या ज्वाळा गॅस सिलेंडरपर्यत गेल्या व त्याचा स्फोट झाल्याने आगीचा मोठा भडका उडाला.

यामध्ये गौतम गायकवाड व प्रकाश गायकवाड यांची घरे व घरातील सामान जळून खाक झाले. आग लागल्याची माहिती समजताच पांगोळी ग्रामस्तांनी लोणावळा नगरपरिषदेच्या अग्नीशमन पथकाला पाचारण केले. 15 मिनिटात घटनास्थळी पोहचलेल्या अग्नीशमन पथकाने आग विझवत आटोक्यात आणली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही मात्र गायकवाड बंधूंचा संसार जळून खाक झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.