Akurdi : सिलेंडरमधून गॅस गळती झाल्याने घराला आग

एमपीसी न्यूज – सिलेंडरमधून गॅस गळती झाल्याने घरात आग लागली. यामध्ये घरातील साहित्य जळाले. ही घटना मंगळवारी (दि. 3) सकाळी कृष्ण नगर आकुर्डी येथे घडली. सुदैवाने घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन विभागाला बाळकृष्ण एकनाथ पाटील यांनी माहिती दिली की, आकुर्डीमधील कृष्णनगर येथे विठ्ठल मंदिराच्या पाठीमागे घरात आग लागली आहे. त्यानुसार मुख्य अग्निशमन विभाग आणि प्राधिकरण उपकेंद्राचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले. आगीमध्ये गॅस सिलेंडरचा पाइप, कपडे आणि घरातील साहित्य जळाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. गॅस सिलेंडर लिकेज झाल्याने ही आग लागली.

सब ऑफिसर सुर्यकांत मठपती, लिडिंग फायरमन भाऊसाहेब धराडे, फायरमन शंकर पाटील, फायरमन विलास कडू,  फायरमन शिवलाल झनकर, फायरमन विष्णु चव्हाण, फायरमन प्रतीक कांबळे, फायरमन महेंद्र पाठक, फायरमन विशाल जाधव, वाहन चालक पद्माकर बोरावाके, वाहन चालक विशाल बानेकर यांच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.