Pune : मुठा कालवा फुटल्याने शहरात प्रचंड वाहतूक कोंडी

एमपीसी न्यूज – खडकवासला धरणातून पुणे शहराला आणि पुढे जिल्ह्याच्या पूर्व भागात जाणारा मुठा उजवा कालवा आज दांडेकर पुलाजवळ सकाळी सव्वाअकराच्या सुमारास फुटल्याने दांडेकर पूल मार्गावर प्रचंड पाणी वाहून रस्त्याला नदीचे स्वरूप आले. परिणामी शहरवासियांना आज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

पूरपरिस्थिती मुळे पोलिसांनी घटनास्थळा जवळील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद केले आहेत. हे रस्ते वाहतुकीचे मुख्य रस्ते असल्या कारणाने वाहनचालकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
वाहतुकीसाठी उपलब्ध असलेल्या पर्यायी रस्त्यांवर शहरात दिवसभर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

सिंहगड रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांना राजाराम पुलाकडून डीपी रस्त्यावर वळविण्यात आले आहे. तर राजाराम पुलाकडून येणारी वाहने गणेश मळा, साथी किशोर पवार चौक येथून दत्तवाडी म्हात्रे पूल, नवी पेठेकडे वळविण्यात आली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.