Pune News : पती म्हणाला ‘तू मरत का नाहीस’ आणि पत्नीने खरे करून दाखवले

एमपीसी न्यूज : जेवण नीट बनवत नाही, आई कडे लक्ष देत नाही या कारणामुळे पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरोधात मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मार्केट यार्ड येथील प्रेमनगर वसाहतीमध्ये 24 मे रोजी हा प्रकार घडला. 

दीपाली कांबळे (वय 26) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी सागर मोहन कांबळे (वय 25) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मयत महिलेची बहिण रूपाली सचिन कांबळे (वय 26) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सागर कांबळे याने दीपाली कांबळे हिला वारंवार त्रास दिला. जेवण नीट बनवत नाही, आई कडे लक्ष देत नाही, माहेरी नातेवाईकाशी फोनवर बोलत असते या कारणावरून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करून मारहाण केली. तसेच तू एकदाची मरत का नाहीस, म्हणजे मला तुझ्यापासून सुटका मिळेल असे म्हणाला. यामुळे दिपाली हिने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. मार्केट यार्ड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.