Kothrud Crime News : डहाणूकर कॉलनीत ऑफिसमध्ये जाऊन पतीेने केला पत्नीचा खून

एमपीसी न्यूज – पुण्याच्या कोथरूड परिसरातील डहाणूकर कॉलनीत आज दुपारच्या सुमारास किरकोळ कारणावरून पतीने पत्नीचा चाकूने वार करून खून केला.

आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पत्नी काम करत असलेल्या ऑफिसमध्ये जाऊन पतीने चाकूने वार करून तिचा खून केला. त्यानंतर आरोपी पती पसार झाला असून अलंकार पोलीस त्याचा शोध घेत आहे.

कीर्ती रवीकुमार पोटे (वय 43) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे तर पोलिसांनी या प्रकरणी रवीकुमार पोटे (वय 50) त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.

अलंकार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोटे दाम्पत्य डहाणूकर कॉलनीत 23 वर्षाच्या मुलीसोबत राहतात. आज दुपारच्या सुमारास कीर्ती पोटे या त्यांच्या ऑफिसमध्ये काम करत होत्या. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास रागाच्या भरात त्यांच्या ऑफिसमध्ये आलेल्या रवीकुमार पोटे याने चाकूने कीर्ती पोटे यांच्यावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या कीर्ती यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

दरम्यान घटनेची माहिती मिळतात अलंकार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घेतली आहे. आरोपी विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.