Nigdi : निगडीत मोटारीवर फांदी पडली; सुदैवाने जीवितहानी नाही

एमपीसी न्यूज – निगडी येथे रस्त्यावर झाडाची मोठी फांदी पडली. यामध्ये एका मोटारीचे नुकसान झाले आहे. सुदैवाने घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. ही घटना आज (सोमवारी) दुपारी तीनच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, निगडी मधील सावली हॉटेल समोर रस्त्याच्या बाजूला एक महाकाय वृक्ष आहे. या वृक्षाची मोठी फांदी आज दुपारी तीनच्या सुमारास पडली. ही फांदी रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या एका मोटारीवर पडली. यामध्ये मोटारीचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्थानिक नागरिकांच्या मदतीने फांदी अग्निशमन विभागाच्या जवानांनी बाजूला केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.