Pune : भरोसा सेवा संकुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

एमपीसी न्यूज – महिला, जेष्ठ नागरिक आणि बालके यांच्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘भरोसा सेल’ चे उद्घाटन आज बुधवारी (दि.9) दुपारी अडीच वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

या उदघाटनासाठी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, पुणे पोलीस आयुक्त के.व्यंकटेशम, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर आदी उपस्थित होते.पुणे पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम यांच्या कल्पनेतून पुण्यात भरोसा सेलची स्थापना करण्यात आली आहे. या सेलच्या माध्यमातून महिला, बालके आणि जेष्ठ नागरिक यांना विश्वासात घेऊन त्यांच्या अडचणी दुर करण्यात मदत केली जाईल.तसेच गुन्ह्याच्या प्रतिबंधासाठी त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून सुरक्षितता देखील पुरवली जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.