Pune News : अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर उघडकीस आली बलात्काराची घटना

एमपीसी न्यूज : पुण्याच्या बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचे उघडकीस आले. 17 वर्षाची ही मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एका तरुणाविरोधात पोक्सो कायद्यानुसार बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाने पीडित मुलीसोबत मैत्री केली. त्यानंतर तिला लग्नाचे अमिश दाखवून तिच्यासोबत राहत्या घरात वारंवार जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले.

या सर्व प्रकारातून पीडित मुलगी सात महिन्यांची गर्भवती राहिली. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.