Pune : अतिक्रमण विरोधी मोहीम होणार आणखी तीव्र 

एमपीसी न्यूज – महापालिकेचा अतिक्रमण विभाग, वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांच्या वतीने सुरू करण्यात आलेली शहरातील अतिक्रमण विरोधी संयुक्त मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेला सत्ताधारी नगरसेवकांकडून होणाच्या विरोधाला न जुमानता पालिका आणि पोलीस प्रशासनाने शहरात विविध ठिकाणी असलेल्या अतिक्रमणांवर कारवाई सुरूच ठेवली आहे.
स्मार्ट सिटीमध्ये वाढलेल्या अतिक्रमणामुळे शहरातील वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पालिका, पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे अतिक्रमणविरोधी कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील 100 ठिकाणे व इतर भाग अतिक्रमण मुक्त केला जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून पालिका आणि पुणे पोलीस यांनी संयुक्तपणे रस्त्यावरील अतिक्रमणे, नादुरुस्त वाहनांवर कारवाई करण्यात आली.

यामध्ये ढोले-पाटील, घोले रोड, धनकवडी, वारजे, वानवडी, हडपसर, भवाणीपेठ, विश्रामबागवाडा या क्षेत्रीय कार्यालयांमधील हद्दीतील 7 स्टॉल, 12 हातगाडी, 8 पथारी, 2 सिलिंडर, 36 शेड, वाहने, इतर 67 वस्तूंवर जप्तीची कारवाई करण्यात आली. शिवाजीनगर वाहतूक विभाग येथील 11 दुचाकी, 1 चारचाकी कोंढवा गोडाऊन येथे हालविण्यात आल्या. तसेच वानवडी रामटेकडी येथील 3 स्टॉल व 11 अनधिकृत शेड तोडण्यात आले.
हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत केलेल्या कारवाईत 2 हातगाडी, 3 स्टॉल, 4 पथारी, 1 सिलिंडर, 6 शेड, इतर 7 आदींवर जप्तीची कारवाई करण्यात आली. ही कारवाई पुणे सोलापूर रोड, गांधी चौक, जनता बैंक समोर, मंत्री मार्केटसमोर, गाडीतळ, पंडित जवाहरलाल नेहरू भाजीमंडई गेट नं-2 समोर करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.