Mpc News Vigil : ‘वायसीएमएच’ मध्ये पार्किंगचा प्रश्न होतोय गंभीर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालय परिसरात पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. जागा अपुरी पडू लागली आहे. वाहने काढताना अडचणी येतात. वाहनचालकांची सुरक्षा रक्षाकांसोबत वादावादी होत असल्याच्या प्रकारामध्ये वाढ झाली आहे.  

संत तुकारामनगर येथे महापालिकेचे 750  खाटांचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आहे. या ठिकाणी औद्योगिकनगरीसह आजुबाजूच्या ग्रामीण भागातून तसेच राज्याच्या इतर भागातूनही हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. रुग्णालयाच्या बाजूला पदव्युत्तर संस्थेच्या इमारतीचे काम सुरु आहे. त्यामुळे जागेची कमतरता भासत आहे.

वायसीएममध्ये रुग्णांची संख्या जास्त असते. रुग्णांना भेटायला येणा-या नागरिकांचे प्रमाण जास्त असते. रुग्णालय परिसरात मोठी वर्दळ असते. दुचाकी, चारचाकी घेवून नागरिक येतात. परंतु, वाहने लावण्यासाठीची रुग्णालय परिसरातील जागा अपुरी पडत आहे.  पार्किंगचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.

वाहने बाहेर  काढताना जागा कमी पडत आहे. वाहनचालक सुरक्षा रक्षकांशी हुज्जत घालतात. भविष्यात वायसीएमएचमधील पार्किंगची समस्या गंभीर होणार आहे. त्यामुळे आत्ताच पार्किंगसाठीचे नियोजन करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.