Pune News : सारसबाग चौपाटीच्या प्रश्नावर अद्याप तोडगा नाही

एमपीसी न्यूज : नियम व अटीच्या संदर्भात हमीपत्र दिल्याशिवाय सारसबाग चौपाटीवरील खाद्यपदार्थ्यांच्या व्यवसायिकांना स्टॉल सुरू करण्यास परवानगी दिली जाणार नाही, अशी माहिती महापालिका अधिकार्‍याने दिली आहे. दरम्यान, सारसबाग चौपाटीवरील व्यवसायिकांना स्टॉल उघडण्यास परवानगी देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

सारसबाग चौपाटी येथे विविध खाद्यपदार्थ्यांचे 53 स्टॉल आहेत. तसेच या ठिकाणी पाळणे व घोडेवालेही आहेत. या ठिकाणी रात्री उशीरापर्यंत शहरातील व परगावाहून येणार्‍या खवय्यांचा राबता असतो. या चौपाटीवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून वारंवार कारवाई होते. मात्र, काही दिवस गेल्यानंतर सर्व परिस्थिती जैसे थे होते. या पार्श्वभूमीवर दहा दिवसापूर्वी महापालिकेने येथील 53 स्टॉल सील केले आहेत. हे स्टॉल पुन्हा सुरू करण्यासाठी व्यवसायिकांकडून शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत.

मात्र, येथील व्यवसायिकांनी स्टॉलच्या बाहेर टेबल व खुर्टी ठेवण़ार नाही, स्टॉलच्या वरील बाजूचा अनधिकृतपणे वापर करणार नाही, रात्रीच्या वेळी स्टॉलमध्ये कामगार राहणार नाहीत, प्रशासनाच्या परस्पर भाडेकरू ठेवणार नाही, भाडे थकवणार नाही, असे हमी पत्र दिल्याशिवाय स्टॉल उघडण्यास परवानगी मिळणार नाही, या मतावर महापालिका ठाम आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.