Express Way : द्रुतगती मार्ग बंद असल्याचा व्हायरल होणारा ‘तो’ व्हिडीओ जुना

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई दरम्यान यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग (एक्सप्रेस वे) वाहतुकीसाठी बंद केला असल्याचा व्हिडीओ जुना असून तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला नसून द्रुतगती मार्गावर (Expeess Way) रेग्युलर नाकाबंदी सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_II

पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग वाहतुकीसाठी बंद केला असल्याचा एक वर्षापूर्वीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नागरिकांनी प्रवास करू नये असे त्या व्हिडीओत सांगितले जात आहे. मात्र तो व्हिडीओ जुना असून सध्या अशा प्रकारचा कोणताही बदल केला नसल्याचे महामार्ग पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

शिरगावचे पोलीस निरीक्षक सुनील पिंजन म्हणाले, “पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग वाहतुकीसाठी सुरू आहे. द्रुतगती मार्गावर नियमित नाकाबंदी सुरू आहे. यात कोरोना साथीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात आहे. ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या वाहनांना जलद गतीने गंतव्य ठिकाणी पोहोचण्यासाठी मदत केली जात आहे. रस्ता बंद करण्याचा प्रकार घडलेला नाही. व्हायरल होणारा व्हिडीओ जुना आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.