Mumbai News: महेंद्रसिंह धोनीने क्रिकेट रसिकांना दिलेला आनंद विसरता येणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार

The joy given to cricket fans by Mahendra Singh Dhoni cannot be forgotten- Deputy Chief Minister Ajit Pawar धोनीने भारतीय क्रिकेटला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. युवा खेळाडूंसाठी, नव्या पिढीसाठी महेंद्रसिंह धोनी हे नाव नेहमीच प्रेरणादायी, मार्गदर्शक राहिल.

एमपीसी न्यूज – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी संपूर्ण कारकीर्दीत त्यांने कोट्यवधी क्रिकेट रसिकांना दिलेला आनंद विसरता येणार नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महेंद्रसिंह धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “धोनीचं यष्टीरक्षण, त्याचा हेलिकॉप्टर शॉट, त्याचा संयम, आव्हानात्मक परिस्थितीतला आत्मविश्वास, मैदानात ‘कॅप्टन कूल’ म्हणून वावरणं, त्याने देशाला जिंकून दिलेला विश्वचषक हे सारं नेहमीच आनंद देत राहिल.

धोनीने भारतीय क्रिकेटला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. युवा खेळाडूंसाठी, नव्या पिढीसाठी महेंद्रसिंह धोनी हे नाव नेहमीच प्रेरणादायी, मार्गदर्शक राहिल. धोनीच्या पुढील वाटचालीसाठी, कारकिर्दीसाठी माझ्या शुभेच्छा.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृती जाहीर केलेला भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना यालाही उपमुख्यमंत्र्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 15 ऑगस्ट रोजी इन्स्टाग्रामवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने आपल्या क्रिकेटचा जीवनक्रम दाखवून पार्श्वभूमीवर गाणे वाजवत चार मिनिटांचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरही पोस्ट केला आहे. मै पल, दो पल का शायर हूँ…. या गाण्यासह धोनीने निवृत्तीची घोषणा केली आहे.

15 ऑगस्ट रोजी केलेल्या आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये तो म्हणाला की, आता मला सायंकाळी 7 वाजून 29 वाजल्यापासून रिटायर समजण्यात यावे. चाहत्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार, असे धोनीने पोस्टमध्ये म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.