Pimpri : काळेवाडी-आळंदी बीआरटी रस्ता नऊ वर्षांनी वाहतुकीस खुला होणार

एमपीसी न्यूज – बहुप्रतिक्षित काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता हा बीआरटीएस मार्ग लवकरच सुरु होणार आहे. सन 2011 पासून या मार्गावर बीआरटीचे काम सुरु असून तब्बल 9 वर्ष रेंगाळलेल्या या मार्गावर लवकरच बस धावणार आहे.

काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता बीआरटीएस मार्ग 10.250 किलोमीटर लांबीचा आहे. तर, 45 मीटर रुंद आहे. या मार्गाचे पाच टप्प्यात विभाजन करण्यात आले आहे. काळेवाडी फाटा ते एमएम शाळा, एमएम शाळा ते विजयनगर (पवना नदी), पवना नदी ते अ‍ॅटो क्लस्टर या मार्गाचे  काम पूर्ण झाले आहे. पवना नदी ते केएसबी चौक हा मार्ग पूर्ण करण्यासाठी जागेची अडचण निर्माण झाली आहे. केएसबी चौक ते चिखली देहू आळंदी रस्ता असे पाच टप्पे करण्यात आले होते. चौथ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आता या मार्गावर बीआरटी बस धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 2011 पासून या मार्गाचे काम सुरु होते.

काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता हा 10.250 किलोमीटर लांबीचा हा मार्ग आहे. या मार्गाचे पाच टप्प्यात विभाजन करून काम पूर्ण करण्यात आले आहे.  या नवीन मार्गाचा फायदा औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना होणार असून, रोज सुमारे एक लाख प्रवासी या बससेवेचा वापर करतील, असा अंदाज आहे.

काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता या बीआरटीएस मार्गावर एकूण 17 बस थांबे असणार आहेत. या सर्व बसथांब्याचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती उपअभियंता व बीआरटीएसचे प्रवक्ते विजय भोजने यांनी दिली.  जागा हस्तांतरण करण्यासाठी अधिकचा वेळ गेला. त्यामुळे हा बीआरटीएस मार्ग लांबणीवर पडला होता. आता या मार्गाचे काम पूर्ण झाले असून, पीएमपी प्रशासनाकडून 10 बस देखील उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले.

काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता या बीआरटीएस मार्गासाठी पीएमपी प्रशासनाने चार्जिंगच्या 10 बस उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु,  निगडी येथील चार्जिंग स्टेशन अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे बस मिळाल्या असल्या. तरी त्या मार्गावर कधी धावतील असा प्रश्‍न आहे.

मार्ग दृष्ट्रीक्षेपात!
लांबी 10.25 किलोमीटर
रुंदी 45 मीटर
पदपथ 1.8 मीटर
सायकल ट्रॅक 25 मीटर
संत मदर तेरेसा उड्डाण पुलाची लांबी 1.6

कामाचे टप्पे आणि खर्च!
काळेवाडी फाटा ते चिंचवड पुल 38 कोटी
चिंचवड पूल ते पवना नदी 21 कोटी 13 लाख
एम्पायर इस्टेट उड्डाणपूल 121 कोटी 85 लाख
पवना नदी ते केएसबी चौक 48 कोटी 84 लाख
केएसीबी चौक ते देहू आळदी रस्ता 50 कोटी 15 लाख

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.