The Kapil Sharma Show: कपिल शर्माने मागितली कायस्थ समाजाची माफी

The Kapil Sharma Show: Kapil Sharma apologizes to Kayastha community

एमपीसी न्यूज – भारतातील सर्वात लोकप्रिय विनोदवीर समजला जाणारा अभिनेता कपिल शर्माने कायस्थ समाजाची माफी मागितली आहे. ‘कपिल शर्मा शो’च्या एका भागामध्ये कायस्थ समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे कपिलने हे पाऊल उचलले आहे. उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर कायस्थ समाज आहे. कपिलने सोशल मीडियाच्या पोस्टद्वारे माफी मागितली आहे.

कपिल शर्मा शोच्या 28 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या भागात कायस्थ समाजाबद्दल काही अनुचित उद्गार निघाले होते. त्यामुळे कायस्थ समाजात अस्वस्थता होती. त्यामुळे ‘प्रिय कायस्थ समाज, 28 मार्च 2020 ला प्रदर्शित झालेल्या ‘द कपिल शर्मा शो’च्या एपिसोडमध्ये श्री चित्रगुप्त यांचा उल्लेख करण्यात आला होता. या उल्लेखाने तुमच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी आणि माझी संपूर्ण टीम तुमची माफी मागतो,’असे म्हणत कपिलने ट्विटद्वारे माफी मागितली आहे.

‘कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता. तुम्ही सर्वजण आनंदी, सुरक्षित आणि कायम हसत रहण्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो’ असेही तो या ट्विटमध्ये म्हणाला.

कपिल शर्मा हा भारतातील सर्वात लोकप्रिय विनोदवीर आणि अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याच्या ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ आणि ‘द कपिल शर्मा शो’मधील विनोद प्रेक्षकांना आवडतात. कधी कधी ते थोडेसे चावट असतात. तरीदेखील हे नर्मविनोद प्रेक्षक पसंत करतात. एका छोट्याश्या घरातून आलेला कपिल शर्मा आज कोट्यवधींचा मालक आहे.

कपिल शर्माने आज जे काही कमावले आहे ते मेहनतीच्या जोरावर. एका छोट्या कुटुंबातून आलेल्या कपिल शर्माचे करिअर आज यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचले आहे.  त्याच्या शोमध्ये अनेक दिग्गज कलाकार देखील हजेरी लावतात.

या आहेत कपिलकडील सर्वात महागड्या पाच गोष्टी

  • पहिल्या क्रमांकावर कपिलचे पंजाबमधील आलिशान घर आहे. या बंगल्याची किंमत 25 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते.
  • दुसऱ्या क्रमांकावर त्याचा डी एच एल एन्क्लेवमधील फ्लॅट आहे. या फ्लॅटची किंमत 25 कोटी रुपये असल्याच्या चर्चा आहेत.
  • तिसऱ्या क्रमांकावर कपिलची वॅनिटी वॅन आहे. या वॅनची किंमत 5.5 कोटी रुपये असल्याचे म्हटले जात आहे.
  • व्होल्वे एक्ससी 90 ही गाडी कपिलच्या सर्वात महागड्या वस्तूंच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. या गाडीची किंमत 1.3 कोटी रुपये आहे.
  • पाचव्या क्रमांकावर कपिलची Mercedes Benz S Class ही गाडी 1.19 कोटी रुपये किंमतीची गाडी आहे.

 

_MPC_DIR_MPU_II

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.