Chikhali: भांडणे करू नको, असे सांगणा-या तरुणावर चाकूने वार

एमपीसी न्यूज – भांडणे करू नको, असे समजावून सांगण्यासाठी गेलेल्या तरूणावर चाकूने वार करत त्याच्या दोन मित्रांनाही हाताने मारहाण केली. ही घटना शुक्रवारी दुपारी पावणे एक वाजता मोरेवस्ती येथे घडली.

अजय वाघनाथ नरवडे (वय-24, रा. दत्त हौसिंग सोसायटी, मोरेवस्ती, चिखली) याने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार निलेश रेणवा, अविनाश टाक, राहूल गुप्ता (सर्व रा. मोरेवस्ती, चिखली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अजय याच्याकडे किरण मोरे कामाला आहे. किरणला मारण्यासाठी आरोपी आले होते. त्यावेळी अजय याने आरोपींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आरोपी निलेश याने अजय याच्यावर चाकूने वार केले. तर, आरोपी अविनाश व राहूल यांनी गणेश अंकुश राख आणि किरण बाळासाहेब मोरे यांना हाताने मारहाण केली. चिखली पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.