Chakan News : चाकूने गंभीर दुखापत करत कामगाराला लुटले

एमपीसी न्यूज – पहाटेच्या वेळी कामावरून घरी पायी चालत जात असलेल्या एका कामगाराला दोन अनोळखी व्यक्तींनी अडवले. फोन आणि पैशांची मागणी करत कामगारावर चाकूने वार करत गंभीर दुखापत केली. ही घटना बुधवारी (दि. 24) चाकण आळंदी रोडवर गवतेवस्ती कमानी जवळ घडली.

सुभाष चंडीचरण साहू (वय 37, रा. मेदनकरवाडी, चाकण) असे जखमी कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी निमाय सुभाष महंती (वय 30, रा. मेदनकरवाडी, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मामेभाऊ जखमी सुभाष हे बुधवारी पहाटे सव्वापाच वाजताच्या सुमारास कंपनीतून घरी पायी चालत जात होते. चाकण आळंदी रोडवर गवतेवस्ती कमानी जवळ त्यांना दोन अनोळखी व्यक्तींनी अडवले.

आरोपींनी सुभाष यांच्याकडे मोबाईल फोन आणि पैशांची मागणी केली. सुभाष यांनी त्यासाठी विरोध केला असता आरोपींनी धक्काबुक्की करत चाकूने मारून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.