Maval : शिरगावमधील दारू भट्टी गुन्हे शाखेकडून उध्वस्त

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील शिरगाव येथे पवना नदीच्या काठावर असलेली दारू भट्टी गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने उध्वस्त केली.

याप्रकरणी राहुल कंजारभाट यांच्याविरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांना माहिती मिळाली की, शिरगाव येथे पवना नदीच्या काठावर देशी दारू बनविण्याची भट्टी आहे. त्यानुसार युनिट पाचच्या पोलिसांनी दारू भट्टीवर छापा टाकला. पोलिसांना पाहून आरोपी राहुल नदी ओलांडून पळून गेला. पोलिसांनी दारू भट्टीसाठी लागणारे दोन हजार लिटर रसायन, अॅल्युमिनिअमची थाळी, हवा मारण्याचा पंप, पाण्याची मोटार, चाटू असा एकूण ९१ हजार २५० रुपये किमतीचा माल उध्वस्त केला.

ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ विवेक मुगळीकर, पोलीस कर्मचारी फारूक मुल्ला, मयूर वाडकर, धनराज किरनाळे, संदीप ठाकरे, स्वामीनाथ जाधव धनंजय भोसले, राजकुमार ईघारे, दत्तात्रय बनसुडे, भरत माने, ज्ञानेश्वर गाडेकर, श्यामसुंदर गुट्टे, दयानंद खेडकर यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.