Shikrapur News: स्थानिक गुन्हे शाखेने दमदार कारवाई करत दुकाने व घरांमध्ये दरोडे टाकणारी टोळी केली जेरबंद

एमपीसी न्यूज : स्थानिक गुन्हे शाखेने दमदार कारवाई करत हायवे रोड लगतच्या दुकाने व घरांमध्ये दरोडे टाकणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद करून दोन दरोड्यासह एकूण नऊ घटना उघडकीस आणल्या आहेत.

अनिल काळे, वय 20 वर्षे, रा. खंडाळा, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा व सागर गौतम, वय 23 वर्षे, रा. भीमनगर, तालुका माढा, जि. सोलापूर या दोन आरोपिंना अटक करण्यात आले आहे.

शिक्रापूर पोलीस ठाण्यात भा. द. वि. कलम 394, 34 अन्वये गुन्हा दाखल असून यातील फिर्यादीला राहत्या घरात मारहाण करुं त्याच्या कडून रोख रक्कम 10,000 रुपये जबरीने चोरी करण्यात आले होते. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकणे समांतर तपास चालू केला होता.

गुन्ह्याच्या अनुषंगाने कोरेगाव येथील घटनास्थळापासून वाघोली ते शिक्रापूर पर्यंत सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. गुन्हा करण्यासाठी चोरट्यांनी खूप सावधगिरी बाळगली होती. आरोपिंचा शोध घेत असताना हा गुन्हा आंतर जिल्हा टोळीने केला असल्याची गोपनीय माहिती तपास पथकाला मिळाली.

Hinjawadi News: फ्लॅटचे लिव्ह अँड लायसन्स रक्कम न देता मागितली सव्वा कोटींची खंडणी

त्या माहितीच्या आधारे व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपिंचा शोध सुरु करण्यात आला होता. त्यावेळेस त्या टोळीचे सदस्य काही चोरीचा ऐवज विकण्यासाठी कोरेगाव भीमा परिसरात येणार असल्याची बातमी मिळाले. त्या अनुषंगाने सापळा रचून टोळीचे दोन म्होरके यांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले होते.

त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी त्यांची नावे अनिल काळे, वय 20 वर्षे, रा. खंडाळा, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा व सागर गौतम, वय 23 वर्षे, रा. भीमनगर, तालुका माढा, जि. सोलापूर अशी सांगितली. त्यांच्याकडील बॅगची पाहणी केल्यावर त्यामध्ये काही मोबाईल मिळाले.

हे मोबाईल त्यांनी चोरी करून विक्रीसाठी आणले असल्याचे सांगितल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार यांनी ते मोबाईल पंचनामा करून जप्त केले आहेत.

त्या दोघांच्याकडे अधिक चौकशी केल्यावर त्यांनी सांगितले की त्यांनी 7 डिसेंबर 2022 रोजी वाघोली ते शिक्रापूर दरम्यान एकूण 9 ठिकाणी गुन्हे केले असून त्यात 2 दरोडे, जबरी चोरी व चोरी या गुन्ह्यांचा समावेष असून त्यांनी 4 मोटर सायकल व 6 मोबाईल, रोख रक्कम चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.

गुन्हा करण्यासाठी त्यांच्या सोबत अन्य 3 विधी संघर्षग्रस्त बाळजे सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयला, अप्पर पोलीस अधीक्षक, पुणे विभाग, मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्य्क पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहाय्य्क पोलीस निरीक्षक सचिन काळे, सहाय्यक पोलूस निरीक्षक वैभव पवार (शिक्रापूर पोलूस ठाणे) व टीमने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.