India Corona Update : मागील 70 दिवसांतील निच्चांकी रुग्ण वाढ, रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर 

एमपीसी न्यूज – भारतात मागील पाच दिवसांपासून एक लाखाहून कमी कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 84 हजार 332 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. मागील 70 दिवसांतील ही निच्चांकी रुग्णवाढ आहे. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 95 टक्क्यांवर पोहोचला आहे. 

देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 कोटी 93 लाख 59 हजार 155 एवढी झाली आहे. त्यापैकी 2 कोटी 79 लाख 11 हजार 384 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या 24 देशात तासांत 1 लाख 21 हजार 311 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या आणखी कमी झाली आहे. सध्याच्या घडीला देशात 10 लाख 80 हजार 690 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातील कोरोना मृतांची संख्या 3 लाख 67 हजार 081 वर पोहोचली आहे. मागील 24 तासांत देशभरात 4 हजार 002 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. देशाचा मृत्यूदर 1.25 टक्के एवढा झाला आहे.

देशात आजवर 37 कोटी 62 लाख 32 हजार 162 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 19 लाख 20 हजार 477 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 24 कोटी 96 लाख 304 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.
देशाचा रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर पोहोचला असून ही दिलासादायक बाब आहे. तसेच, आठवड्याचा पॉझिटिव्ह रेट पाच टक्क्यांवर आहे तर, दैनंदिन पॉझिटिव्ह रेट 4.39 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.