Moshi News : चेन मार्केटिंग कंपनी कडून लाखो रुपयांच्या फसवणूक

फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पैसे  गुंतवल्यास अधिक नफा तसेच विदेशात ट्रीप देण्याचे आमिष दाखवून ग्राहकाकडून लाखो रुपये उकळले. त्यानंतर अधिकचा नफा तसेच विदेशात ट्रीप न देता त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली असल्याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जून 2018 पासून 20 एप्रिल 2021 या कालावधीत ड्रीम व्हिजन 4 यु प्रा. लि. या कंपनीत मोशी प्राधिकरण येथे घडला.

ड्रीम व्हिजन 4 यु प्रा. लि. या कंपनीचे सीएमडी दिनेश  कुरकुटे, संचालक दिपिका दिनेश कुरकुटे, प्रतिनिधी विनायक शिरोळे, उपाध्यक्ष नवनाथ मगर, सीओ अमित कुमार पोंडे, कॅशियर नितीन कुरकुटे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत प्रचंड दादासाहेब भुसारे (वय 42, रा. डोणगाव, ता. केज, जि. बीड) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून त्यांच्या कंपनीमध्ये ग्राहकाने पैसे गुंतविल्यास जास्त मोबदला मिळण्याची फिर्यादी ग्राहकाला वेगवेगळी आमिषे दाखविली. त्यामध्ये साडेसात हजार रुपये गुंतविल्यास कंपनी ग्राहकाला एक प्रॉडक्ट देऊन ग्राहकाचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून त्याला एक आयडी देणार. साडेसात हजार रुपयांची गुंतवणूक  केलेल्या ग्राहकाने कंपनीला दोन ग्राहक आणून दिल्यास कंपनी त्या ग्राहकाला पाचशे रुपये कमिशन आणि रॉयल्टी म्हणून दर महिन्याला 1 हजार 275 रुपये देणार असल्याचे दुसरे अमिश दाखवले.

एसीएम प्लॅनच्या नावाखाली साडेसात हजार रुपयांची गुंतवणूक केलेल्या ग्राहकाने कंपनीला 27 ग्राहक आणून दिल्यास कंपनी त्या ग्राहकाला 13 हजार 500 रुपये कमिशन आणि रॉयल्टी म्हणून 16 हजार 575 रुपये 24 महिने देणार. तसेच एक थायलंड टूर देणार असल्याचे तिसरे अमिश दाखवले. कंपनी प्रत्येक ग्राहकाला कंपनीच्या नफ्यामधील पाच टक्के रक्कम देणार असल्याचे चौथे अमिश आरोपींनी फिर्यादी यांना दाखवले.

जादा परताव्याचे आणि थायलंड टूरचे अमिश दाखवून फिर्यादी यांना आरोपींच्या कंपनीत आठ लाख 55 हजार रुपये गुंतविण्यास सांगितले. त्यानंतर रॉयल्टी म्हणून 92 हजार 275 रुपये आरोपींनी फिर्यादी यांना परत दिले. प्लॅन प्रमाणे 24 महिने रॉयल्टी, थायलंड टूर, कंपनीच्या नफ्यातील पाच टक्के रक्कम न देता फिर्यादी यांची फसवणूक केली. अशाच प्रकारे आरोपींनी फिर्यादी यांच्या तालुक्यातील अन्य लोकांची देखील फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.