Hinjawadi : कुंपण घालणाऱ्या जागामालकाला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी; आठ जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – स्वतःच्या जागेत वॉल कंपाऊंडचे बांधकाम करताना आठ जणांनी मिळून जागामालकाला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. तसेच कामगार जेसीबी चालकाला मारहाण केली. ही घटना बावधन बुद्रुक येथे गुरुवारी (दि. 27) दुपारी तीनच्या सुमारास घडली.

अमोल तानाजी दगडे, प्रमोद दिलीप दगडे (दोघे रा. बावधन बुद्रुक) आणि त्यांच्या ऑक्सफर्ड गोल्फ क्लब बावधन येथील सहा बाउन्सर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गणेश ज्ञानेश्वर कु-हे (वय 34, रा. बावधन बुद्रुक) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन बुद्रुक येथे मुहूर्त लॉन्सच्या बाजूला गणेश कु-हे आणि निलेश बाळासाहेब दगडे या दोघांची सामायिक जमीन आहे. त्या सामायिक जमिनीमध्ये गणेश भिंतीचे कंपाउंड करीत होते. त्यासाठी त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू केले. त्यावेळी आरोपी तिथे आले ‘तू इथून निघ, नाहीतर तुला गोळ्या घालून खलास करू’ अशी धमकी देत त्यांच्यासोबत असलेल्या सहा बाउन्सरने गणेश यांना गराडा घातल. अमोल आणि प्रमोद या दोघांनी जेसीबी चालक गोविंद राठोड यांना शिवीगाळ करून मारहाण केली. जेसीबी चालकाचा मोबाईल बाऊंसरने फोडला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.