Pune : ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – दुचाकीवर आलेल्या चोरट्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावले. ही घटना शुक्रवारी (दि.31मे) सकाळी साडेअकराच्या सुमारास सदाशिव पेठ येथे घडली.

याप्रकरणी एका 60 वर्षीय ज्येष्ठ महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार एका अज्ञात मोटारसायकलस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिला या शुक्रवारी आपल्या मुलीसह सदाशिव पेठ येथे आल्या असत्या आरोपीने त्यांच्या जवळ येऊन त्यांच्या समोर मोटारसायकल आडवी लावली. त्यांना हाताने मारून त्यांच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेले.

विश्रामबाग पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.