Pune : मॉर्निग वॉक करुन घरी येणा-या महिलेचे मंगळसुत्र हिसकावले

दुचाकीस्वार फरार 

एमपीसी न्यूज – सकाळी प्रभातफेरी करुन पतीसह घरी परतत असताना मोटारसायकल वरुन आलेल्या दोन अनोळखी इसमांनी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र हिसकावून फरार झाले. ही घटना 20 तारखेला सकाळी 8.45 च्या सुमारास खडकी येथील 34 डंकन रोड, स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या समोर घडली.

महिला फिर्यादी, (वय 56, राहणार, खडकी) यांनी खडकी पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. प्रभातफेरी मारुन घरी जात असताना दुचाकीस्वार जवळ आले व गळ्यातील 97,500 रुपयांचे गंठन जबरदस्तीने हिसका मारुन तोडून नेल्याचे फिर्यादी यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.