Pune : मराठा आरक्षण आंदोलन यशस्वी होईल;राजु शेट्टींना विश्वास

एमपीसी न्यूज – आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला सर्व जाती-धर्माच्या लोकांनी, राजकिय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. इतक्या मोठ्या संख्येने मोर्चे निघुनही सरकारने काहीच हालचाली केल्या नाहीत. आता आंदोलक हिंसक झाल्याने सरकारला जाग आली आहे. मराठा समाजातील तरुणांनी संयम राखणे गरजेचे असल्याचे सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजु शेट्टी यांनी मराठा आरक्षण आंदोलन यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केले. दुध दर आंदोलन यशस्वी झाल्याच्या पार्श्वभुमीवर राजु शेट्टी यांनी आज पुण्यातील पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. 

 
आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची मागणी काही राजकिय नेत्यांकडून होत त्यावर बोलताना शेट्टी म्हणाले, आर्थिक निकषावर आरक्षण देताना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. आर्थिक निकषाच्या नावाखाली मूळवर्गाला लाभ न मिळता धनदांडगे त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्तिक निकषावर आरक्षण देण्याचे ठरल्यास त्याचा लाभ ख-या गरजुपर्यंत पोहोचणार नाही. आज संपुर्ण देशातील शेतीवर अवलंबून असणारे नागरिक आरक्षणासाठी आंदोलनं करत आहेत. शेतीची घडी विस्कटल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. महात्मा फुलेंनी त्यांच्या शेतक-यांचा आसूड या पुस्तकात ही स्थिती यापुर्वीच मांडली आहे. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.