Moshi : फ्लॅट घेण्यासाठी दहा लाखांची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – फ्लॅट घेण्यासाठी बहिणीकडून दहा लाख रुपये आणण्याची मागणी केली. यासाठी महिलेने नकार दिला असता तिचा छळ केला. ही घटना 20 मे 2013 ते 8 एप्रिल 2019 या कालावधीत मोशी येथे घडला.

पती कुलदीप रामदास पवार (वय 34), सासू मीनाक्षी रामदास पवार (दोघे रा. मोशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 33 वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि कुलदीप यांचा 2013 साली विवाह झाला. त्यानंतर कुलदीप याने फ्लॅट घेण्यासाठी महिलेच्या बहिणीकडून 10 लाख रुपये आणण्याची मागणी केली. त्यासाठी महिलेने नकार दिला. त्यावरून कुलदीप आणि त्याच्या आईने महिलेचा छळ केला. तसेच मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.