Pune News : महापौरांचा दावा फोल, ​तातडीनं लस पुरवठा केल्याबद्दल मानले होते पंतप्रधानांचे आभार 

एमपीसी न्यूज : केंद्र सरकारकडून पुण्याला रातोरात जवळपास अडीच लाख कोरोना लसीच्या डोसची व्यवस्था करुन दिली. तर आज आणखी सव्वालाख डोस पुण्यासाठी उपलब्ध होतील. कोरोना (Corona) लसीं चा तुटवडा जाणवू लागल्यानंतर​​ तातडीनं लस पुरवठा केल्याबद्दल पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

प्रत्यक्षात मात्र 1 लाख लसीच पुणे जिल्ह्यासाठी पोहोचल्या. यात महत्त्वाची बाब म्हणजे फक्त पुणे जिल्ह्यासाठीच नव्हे, तर इतरही जिल्ह्यांसाठी लसींचा पुरवठा करण्यात आला. सातारा जिल्ह्यासाठी 35 हजार, सोलापूर जिल्ह्यासाठी 17 हजार अशा प्रमाणात लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यासाठी देण्यात आलेल्या लसींमध्ये काही भाग हा ग्रामीण भागासाठीही राखीव असणार आहे.

ज्यामध्ये 30 हजार शहरासाठी आणि 20 हजार डोस पिंपरी चिंचवड शहरासाठी देण्यात येणार आहे. परिणामी ज्या प्रक्रियेनं लसींचा पुरवठा करण्यात आला होता, तीच प्रक्रिया पुन्हा अवलंबण्यात आली आहे. इथं महत्त्वाची बाब अशी, की राज्य शासनाकडूनच हा लसीचा पुरवठा करण्यात आला आहे. आरोग्य विभागानं यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यामुळं महापौरांचा दावा एका अर्थी फोल ठरत आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.