Chakan : अवैध मांस वाहतूक करणारा टेम्पो जप्त 

वीस लाखांचे मांस ; चाकण जवळील कारवाई 

एमपीसी न्यूज – मालाची  वाहतूक करीत असल्याचा बनावाद्वारे गोवंश जनावरांची कत्तल करून मांस वाहतूक करणारा टेम्पो स्वयंसेवी संस्थानी पाठलाग करून पकडल्याची घटना रविवारी (दि.२१) सकाळी दहाचे सुमारास पुणे नाशिक महामार्गावर एकतानगर (चाकण, ता. खेड) येथे घडली.  संबंधित टेम्पोची तपासणी केली असता तब्बल २० लाख रुपये किमतीचे मांस मिळून आले असून टेम्पो चालकाने टेम्पो पकडण्यासाठी कार्यकर्ते आल्याचे पाहून टेम्पो जागेवरच सोडून पोबारा केला.

शिवशंकर राजेंद्र स्वामी (वय २५ वर्ष, रा. रेव्हेन्यू कॉलनी, शिवाजीनगर, पुणे) यांनी या बाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. संबंधित टेम्पो मधून गोमांसाची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्याने काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पुणे नाशिक महामार्गावर  टेम्पोचा पाठलाग केला. टेम्पोची तपासणी केली  त्यावेळी टेम्पोतील लाकडी फळ्या  व अन्य मालाच्या खाली गोवंश जनावरांचे मांस भरलेल्या प्लास्टिकच्या गोणी आढळून आल्या.
पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.