_MPC_DIR_MPU_III

Pune : केरळ वासियांचे अश्रू पुसण्यासाठी आरोग्यसेनेची वैद्यकीय मदत 30 ऑगस्ट रोजी रवाना होणार

एमपीसी न्यूज – केरळ वर न भूतो न भविष्यती अशी अस्मानी आपत्ती कोसळली आहे. सध्या केरळमधील दहा लाख पूरग्रस्त सुमारे सहा हजार छावण्यांमध्ये राहत आहेत. केरळमध्ये वैद्यकीय मदत देण्यासाठी आरोग्य सेनेचे दहा सदस्यांचे वैद्यकीय मदत पथक 30 ऑगस्ट रोजी रवाना होणार आहे. या पथकाचे नेतृत्व आरोग्य सेनेचे संस्थापक डॉक्टर अभिजित वैद्य करणार आहेत. 

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

या पथकात डॉक्टर नितीन केतकर, प्राध्यापक प्रमोद दळवी, वर्षा गुप्ते, अतुल रुणवाल, रमाकांत सोनवणी, स्वप्नील वैद्य, आनंद चव्हा,  केतन जाधव हे सदस्य असणार आहेत. हे पथक मुख्यतः कोची या भागात काम करेल. त्यांच्याबरोबर अनेक प्रकारची औषधे मोठ्या प्रमाणावर असणार आहेत. त्याचबरोबर अनेक उपकरणे देखील असणार आहेत. त्याच्या तयारीसाठी आरोग्य सेनेच्या तमिळनाडू राज्य शाखेचे प्रमुख डॉक्टर रवीचांदीरन आधीच तिथे पोहोचले असून ते वैद्यकीय मदतीची गरज असणारा भाग सोडून ठेवणार आहेत.

वैद्यकीय मदत बरोबर पूरग्रस्त लोकांना मोठ्या प्रमाणावर भांडी स्टोअर मिक्सर गोष्टी लागणार आहेत. हे साहित्य कार्यकर्ते  विकत घेऊन ते गरजवंत लोकांना वाटणार आहेत. या सगळ्या कार्यात एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारिप बहुजन महासंघाचे कार्यकर्ते देखील मदत करणार आहेत. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत याबद्दलची माहिती प्रकाश आंबेडकर आणि डॉक्टर अभिजित वैद्य यांनी दिली आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.