Chakan News : मेडीकल दुकान फोडून रोकड आणि साहित्य लंपास

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील खालुम्ब्रे गावात चाकण तळेगाव रोडवर असलेले मेडिकल दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम आणि साहित्य चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 17) सकाळी उघडकीस आली.

 सिद्धेश्वर लिमण्णा फताटे (वय 35 रा. म्हाळुंगे, ता. खेड) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे चाकण-तळेगाव रोडवर खालुम्ब्रे गावात आयुष मेडिकल हे दुकान आहे. शुक्रवारी रात्री दहा वाजता फिर्यादी यांनी मेडिकल दुकान कुलूप लावून बंद केले.

रात्री अज्ञात चोरट्यांनी मेडिकल दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. मेडिकल दुकानातून एचपी कंपनीचा लॅपटॉप, डी व्ही आर, वाय-फाय राऊटर आणि 15 हजारांची रोख रक्कम असा एकूण 26 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरी करून नेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.