Pune : पुढील 50 वर्षांचा विचार करून मेट्रोचा शहरात विस्तार

एमपीसी न्यूज – पुढील पन्नास वर्षांचा वेध घेत पुणे शहर, जिल्हा आणि सभोवतालची औद्योगिक केंद्राला एकत्र जोडण्यासाठी मेट्रोचे विस्तृत जाळे निर्माण करण्याची गरज आहे. पीएमआरडीएच्या सर्वंकष वाहतूक आराखड्यामध्ये पुणे शहराच्या हद्दीतून जाणार्‍या सिंहगड रस्ता ते पुणे कॅन्टोन्मेंट (९ किमी), वारजे ते स्वारगेट (११ किमी), रामवाडी ते वाघोली व वनाज ते चांदणी चौक (१० किमी), स्वारगेट ते कात्रज (६ किमी) आणि शिवाजीनगर ते हडपसर (१२ किमी) या मेट्रो मार्गिका प्रस्तावित आहेत.

या मार्गिकांचा महामेट्रोच्या माध्यमातून सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पुणे शहराच्या चारही बाजूंना प्रत्येकी ५० किलोमीटर लांबीची मेट्रो मार्गिका विस्तारीत करण्यात येणार आहे.  शहराच्या हद्दीतील मार्गिकेच्या डीपीआरसाठी महापालिका आणि शहराच्या हद्दीबाहेर पीएमआरडीए निधी उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी बजेटमध्ये दिली आहे. तर, पुणे शहराच्या कानाकोपऱ्यात मेट्रो नेणार असल्याचा विश्वास महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.