Hinjwadi : दूध टँकर चालकाला मारहाण करत लुटले

एमपीसी न्यूज – दुधाचा टँकर घेऊन जाणार्‍या चालकाला दुचाकीवरून आलेल्या चौघांनी टँकर चालकावर चाकूने वार करून त्याच्याकडील रोकड लुटून नेली. ही घटना शुक्रवारी रात्री दहा वाजता बंगळुरु-महामार्गावर सुतारवाडी येथे घडली.

याप्रकरणी पंचलाल श्रीलल्लू पाल (उत्तरप्रदेश) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी हे शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास बंगळुरु महामार्गावरून दुधाचा टँकर घेऊन जात होते. सुतारवाडी येथे आल्यानंतर दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी त्यांचा टँकर अडविला. टँकरवर चढून आरोपींनी मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यांच्या खिशातील पैसे काढून घेत दोन्ही हातावर, चेहर्‍यावर चाकूने वार करून गंभीर जखमी करून आरोपी पसार झाले. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.