Hinjwadi : मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोघांचे मोबाईल हिसकावले

एमपीसी न्यूज – मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोघांचे दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 32 हजार रूपयांचे दोन मोबाईल हिसकावले. ही घटना हिंजवडीतील द्रौपदी लॉन्स येथे शुक्रवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास घडली. तर, तळेगाव – दाभाडे येथे मॉर्निंग वॉकला गेलेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून नेले. हिंजवडीतील घटनेप्रकरणी महेंद्र अशोक मोरे (वय 29, रा. अनंतानगर, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मोरे हे पद्मभूषण चौकात 10 मे रोजी सकाळी मॉर्निंग वॉक करत होते. दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी मोरे यांचा सात हजार रूपये किमतीचा मोबाईल हिसकावला आणि पळ काढला. दुसरी घटना हिंजवडीतील द्रौपदा लॉन्सजवळ घडली. अधिश निगम हे त्यांच्या पत्नीसोबत मॉर्निंग वॉक करण्यासाठी जात होते. दुचाकीवरील तिघा चोरट्यांनी त्यांचा 25 हजार रूपयांचा मोबाईल हिसकावून पोबारा केला. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

तळेगाव – दाभाडे येथील घटनेप्रकरणी लीला सूभाष डुंबरे (वय 70, रा. वतननगर, तळेगाव स्टेशन) यांनी फिर्याद दिली आहे. लीला या वतनगनर येथील रस्त्याने वॉकींग करत होत्या. यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघांनी लीला यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून नेले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.