Nigdi : मुलाबरोबर झालेल्या भांडणातून आईला मारहाण

एमपीसी न्यूज – मुलाबरोबर एक महिन्यापूर्वी झालेल्या भांडणातून चौघांनी त्याच्या आईला व मित्राला लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने जबर मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना गुरूवारी (दि.11) दुपारी अडीच वाजता आकुर्डी गावठाण येथे घडली.

रोहित चंद्रकांत कुटे (वय-19, रा. मारूती मंदिर समोर, आकुर्डी गावठाण) याने याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्रम, लाल्या भिसे, विशाल, बबलु शर्मा (रा. दळवीनगर झोपडपट्टी, चिंचवड, पूर्ण नाव माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित व आरोपी यांच्यामध्ये एक महिन्यापूर्वी भांडण झाले होते. याच रागातून आरोपींनी गुरूवारी दुपारी रोहितची आई सुनिता कुटे व त्याचा मित्र तेजल येवले यांना शिवीगाळ करत लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. निगडी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.