Pimpri : घरातील सामान घेऊन जाण्यास रोखल्याने सासूला मारहाण

एमपीसी न्यूज – जावई घरातील सामान घेऊन जात असल्याने सासूने त्याला रोखले. या रागातून जावई आणि त्याच्या तीन साथीदारांनी मिळून सासूला शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 25) दुपारी साडेचारच्या सुमारास इंदिरानगर, चिंचवड येथे घडली.

सखुबाई तुकाराम डोंगरे (वय 50, रा इंदिरानगर झोपडपट्टी, चिंचवड) असे जखमी सासूचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार जावई राजेश चंद्रकांत पाटील (वय 30), मंगेश चंद्रकांत पाटील (वय 28), गणेश बाबासाहेब शिंदे (वय 23), संजय जगन चव्हाण (वय 34, सर्व रा. म्हाडा कॉलनी, वाशी नाका, चेंबूर मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सखुबाई रविवारी दुपारी त्यांच्या मुलीच्या घरी गेल्या. त्यावेळी त्यांचा जावई राजेश त्याच्या साथीदारांसोबत मिळून घरातील सामान घेऊन जात होता. घरातील सामान नेण्यास सखुबाई यांनी विरोध केला. यावरून आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. सखुबाई यांच्या डोक्यात गंभीर इजा झाली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.