Pune News : सुनबाईला आणण्यासाठी गावी गेलेल्या सासूबाईला व्याह्याकडून बेदम मारहाण

एमपीसी न्यूज : नवऱ्यासोबत भांडण करून माहेरी गेलेल्या सुनबाई ला आणण्यासाठी सासुबाई गेली असता तिला विहीण आणि व्याह्यानी बेदम मारहाण केली. पुणे जिल्ह्यातील पारगावात रविवारी दुपारी हा प्रकार घडला. याप्रकरणी आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशा दिलीप चव्हाण (वय 35) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून देवराम गंगाराम मोरे आणि अनिता देवराम मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या मुलाचे देवराम मोरे यांच्या मुलीसोबत लग्न झाले आहे. परंतु नवरा बायकोत भांडण झाल्यामुळे देवराम मोरे यांची मुलगी माहेरी येऊन राहत होती. फिर्यादी या तिला घेऊन जाण्यासाठी रविवारी दुपारी आल्या होत्या. परंतु देवराम मोरे यांनी तुमचा मुलगा दारू पितो मी आता आमच्या मुलीला तुमच्याबरोबर पाठवणार नाही असे म्हणून त्यांना शिवीगाळ आणि दमदाटी केली. त्यानंतर फिर्यादी घरी निघाल्या असता व्याही देवराम मोरे यांनी त्यांना दगडाने मारहाण केली.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.