Pune News : अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलीचा आईनेच केला खून, अपहरण झाल्याचा केला बनाव 

एमपीसी न्यूज – घटस्फोटीत महिलेला अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलीचा आईनेच तोंड दाबून खून केला आणि आपल्या 13 वर्षाच्या मुलाच्या सहाय्याने बंडगार्डन पुलावरून नदीत फेकून दिले व अपहरण झाल्याचा बनाव केला. पोलिसांनी आरोपी आई व तिच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.22) तीन महिन्यांच्या मुलीचे अपहरण झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार येरवडा पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला.

पोलिसांनी फिर्यादी व त्यांचा लहान मुलगा यांना विश्वासात घेवून चौकशी केली. तपासात फिर्यादी महिला हि घटस्फोटीत असुन तिला अनैतिक संबंधातुन तीन महिन्यापुर्वी मुलगी झाली झाल्याचे आढळून आले. या मुलीबाबत नातेवाईकांना काय सांगायचे या कारणावरुन फिर्यादी महिलेने राहते घरात तीन महिन्यांच्या लहान मुलीचे तोंड दाबुन तिला ठार मारले.

महिलेने तीच्याच 13 वर्ष वयाच्या मुलाच्या मदतीने मृतदेह गोणीत बांधुन बंडगार्डन पुलावरुन नदीत फेकुन दिला असल्याचे मुलाने सांगितले. मृतदेहाचा शोध घेतला असता नदीत मृतदेह सापडला.

मृतदेह शवविच्छेदनासाठी ससुन रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या गुन्हयात मृत मुलीची आई (फिर्यादी महिला) व तिच्या 13 वर्षाच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.