Wakad : जागा आणि खोल्या देण्यास नकार दिल्याने आईला बेदम मारहाण

मुलगा, सुनेसह चौघांवर गुन्हा

0

एमपीसी न्यूज – ‘राहत्या ठिकाणची जागा आणि बांधलेल्या खोल्या आम्हाला दे’ म्हणत मुलगा, सून आणि सुनेच्या आई-वडिलांनी मिळून महिलेला मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 17) रात्री साडेदहा वाजता पडवळनगर, थेरगाव येथे घडली.

 

सीताबाई महादेव वाघमारे (वय 65, रा. पडवळनगर, थेरगाव) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्यांनी याबाबत बुधवारी (दि. 18) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुलगा अशोक महादेव वाघमारे (वय 40), सून प्रीती अशोक वाघमारे (वय 35, रा. पडवळनगर, थेरगाव) आणि प्रीतीचे आई-वडील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सीताबाई यांची पडवळनगर, थेरगाव येथे गणेश मंदिराच्या समोर जागा आहे. त्या जागेवर त्यांनी काही खोल्या बांधल्या आहेत. आरोपी अशोक हा फिर्यादी यांचा मुलगा तर प्रीती ही सून आहे. ‘राहती जागा आणि बांधलेल्या खोल्या आम्हाला दे, आम्ही तुला मरे पर्यंत सांभाळू’ अशी आरोपींनी सीताबाई यांच्याकडे मागणी केली. त्यासाठी सीताबाई यांनी नकार दिला.

 

यावरून आरोपी मुलगा आणि सुनेने त्यांना केसाला पकडून भिंतीवर डोके आपटून गंभीर जखमी केले. तर प्रीतीच्या आई वडिलांनी सीताबाई यांना शिवीगाळ करून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III