Patna News : आता तर हद्दच झाली…! आईचे नाव ‘सनी लिओनी’ तर, वडिलांचे ‘इम्रान हाश्मी’ ; मुजफ्फरपूर मधील विद्यार्थांचा अजब पराक्रम

एमपीसी न्यूज – बऱ्याच वेळा आपण आधार कार्ड, मतदान कार्डवरील नाव चुकल्याच्या घटना पाहिल्या आहेत. तसेच, अनेक ठिकाणी सिनेतारकांची नावे आलेली पाहिली आहेत. एकदा अभिनेत्री सनी लिओनी’चे नाव कोलकात्यातील महाविद्यालयाच्या मेरिट लिस्टमध्ये झळकले होते. मात्र, मुजफ्फरपूर महाविद्यालयीन विद्यार्थांने अर्जात अजबच पराक्रम केला आहे.

बिहारमधील मुझफ्फरपूर येथील बीएचं शिक्षण घेणाऱ्या कुंदन कुमार या युवकानं आपल्या महाविद्यालायाच्या फॉर्ममध्ये आई म्हणून चक्क अभिनेत्री सनी लिओचं नाव लिहिलं आहे. एवढंच नव्हे तर त्याने आपले वडील अभिनेता इम्रान हाश्मी असल्याचंही त्या फॉर्ममध्ये नमूद केलंय. विद्यार्थ्यांचा हा अजब पराक्रम केलेला फॉर्म सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

दरम्यान, या प्रकरणावर अभिनेत्री सनी लिओनीनं मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. तिनं आपल्या आकाउंटवरून हा फॉर्म रिट्वीट करत, “हा मुलगा कमाल आहे, एवढं मोठं स्वप्न, हा हा हा” अशी प्रतिकिया दिली आहे.

कुंदन कुमार धनराज महतो महाविद्यालयात शिकत आहे. कुंदन कुमारने आपला पत्ता मुझफ्फरपूर असा सांगितला आहे. महाविद्यालयाच्या फॉर्ममध्ये सनी लिओनी आणि इम्रान हाशमी यांचं नाव वाचून महाविद्यालयातील स्टाफही गोंधळात पडला. विद्यार्थ्यानं जाणीवपूर्वक हा खोडसाळपणा केला असल्याचं मत महाविद्यालयातील स्टाफच्या काही सदस्यांनी व्यक्त केलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.